Ad will apear here
Next
‘No.. No... चेहऱ्याला हात लावू नका;’ करोना प्रतिबंधासाठी कम्प्युटर/लॅपटॉप देणार इशारा; तरुणाचे अॅप
प्रसाद सेठ

करोना विषाणूने सध्या जगभरात सगळीकडे हाहाकार माजवला आहे. त्यावर अद्याप औषध नसल्याने प्रतिबंधात्मक काळजीच कसोशीने घ्यायच्या सूचना अगदी जागतिक आरोग्य संघटनेपासून (WHO) सगळ्याच महत्त्वाच्या संस्था देत आहेत. करोनाचा संसर्ग टाळण्याचा एक उपाय म्हणून हात वारंवार धुवा आणि चेहऱ्याला सतत हात लावू नका, अशाही सूचना दिल्या जात आहेत; तरीही थोड्या थोड्या वेळाने चेहऱ्याला हात लावण्याची सवय अनेकांना असते. ही सवय मोडण्यासाठी पुण्यातील एका तरुण कम्प्युटर इंजिनीअरने एक अॅप विकसित केले आहे. काम करत असताना हात चेहऱ्याला लावला गेला किंवा चेहऱ्याच्या दिशेने गेला, तर हे अॅप ‘नो.. नो’ असा आवाज करून संबंधित व्यक्तीला इशारा देते. विनाकारण सतत चेहऱ्याला हात लावण्याची सवय मोडण्यास हे अॅप मदत करणार आहे. 

प्रसाद सेठ असे या कम्प्युटर इंजिनीअरचे नाव आहे. त्याने आतापर्यंत अनेक समाजोपयोगी सॉफ्टवेअर्स विकसित केली आहेत. जागतिक आरोग्य संघटनेसह अनेक महत्त्वाच्या संस्थांनी चेहऱ्याला वारंवार हात न लावण्याच्या सूचना केल्या आहेत; पण काम करताना नकळत चेहऱ्याला हात लावण्याची सवय अनेकांना असते. हे लक्षात घेऊन प्रसादच्या डोक्यात हे वेब अॅप विकसित करण्याची कल्पना आली. फेस टच अॅलर्ट असे या अॅपचे नाव असून, त्याने ते मोफत उपलब्ध केले आहे. 

अॅप कसे काम करते?
https://facetouchalert.netlify.com/ या लिंकवर हे वेब अॅप मोफत उपलब्ध आहे. कम्प्युटर/लॅपटॉपवरून काम करत असताना इंटरनेट ब्राउझरमध्ये हे अॅप ओपन करून ठेवायचे आहे. त्याला कॅमेरा अॅक्सेस द्यावा लागतो. हे अॅप एका विंडोमध्ये ओपन करून ठेवून आपण आपले काम करू शकतो. काम करताना आपला हात चेहऱ्याजवळ गेला किंवा चेहऱ्याला लागला, तर या अॅपमधून ‘नो..नो’ असा आवाज येतो. किती कालावधीत आपण किती वेळा चेहऱ्याला हात लावला याची नोंदही हे अॅप ठेवते. तसेच, एखाद्याला अगदीच वारंवार चेहऱ्याला हात लावायची सवय असेल तर दोन अॅलर्टमधील कालावधीही त्यानुसार सेट करता येतो. चेहऱ्याला हात लावण्याची सवय मोडण्यास हे अॅप मदत करू शकते. (हे अॅप कसे काम करते, याचा व्हिडिओ शेवटी दिला आहे.)

एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या अॅपला कॅमेरा अॅक्सेस द्यावा लागत असला, तरी यातील डेटा कुठल्याही सर्व्हरवर पाठवला जात नाही. त्यामुळे आपली माहिती दुसऱ्या कोणाच्या हाती लागण्याची भीती नाही. शिवाय यासाठी कोणतेही लॉगिनही लागत नाही. त्यामुळे हे अॅप उपयुक्त आहे. 

याआधीही प्रसादने अशीच काही समाजोपयोगी अॅप्स विकसित केली आहेत. हेल्थ स्कॅन हे ऑटिस्टिक मुलांना उपयोगी ठरणारे अॅप, तसेच कर्णबधिरांसाठी इझी टेक्स्ट टू स्पीच अॅप त्याने विकसित केले आहे. इझी टेक्स्ट टू स्पीच अॅपच्या साह्याने कर्णबधिरांना संवाद साधणे सोपे होते. हे अॅप आतापर्यंत २७ हजारांहून अधिक जणांनी वापरले आहे. 

रोटरी-रोटरॅक्ट पनवेल मिडटाउनकडून अलीकडेच प्रसादला यंग इनोव्हेटर पुरस्कारही मिळाला आहे. तसेच, सनबीम इन्स्टिट्यूटनेही त्याचा गौरव केला आहे. ‘रोटरॅक्ट इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१३१’मध्ये तो डिस्ट्रिक्ट प्रोफेशनल डेव्हलपमेंट डायरेक्टर, तसेच प्रोफेशनल असिस्टन्स ऑफिसर म्हणून कार्यरत आहे. 

‘माझ्या शिक्षणाचा उपयोग समाजाला व्हावा, म्हणून मी अशा पद्धतीची समाजोपयोगी अॅप्स विकसित करतो,’ असे प्रसादने सांगितले. 

प्रसादचा ई-मेल : prasadlt6@gmail.com



 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZKWCK
Similar Posts
चाकरमान्यांनो, ‘येवा कोकण आपलाच आसा...’ चाकरमान्यांनो, ‘येवा कोकण आपलाच आसा...’ यायलाच हवं तुम्हाला... गणपती काय आपल्या घरी कायमच असतो हो.... पण त्याचा उत्सव वर्षातून एकदाच होतो आणि तोसुद्धा किती मोठा! नाही आलात तर त्याला काय वाटेल? जीव काय, आज आहे उद्या नाही... त्याची कशाला काळजी करायची! आपण आहोत, तोपर्यंत मजेत जगायचं! सारं काही त्या गणपतीला माहिती आहेच
पुण्यातील डॉ. रोहन कुलकर्णी यांना जागतिक पातळीवरील ‘स्टेम सेल्स तरुण संशोधक’ पुरस्कार पुणे : स्टेम सेल्स अर्थात मूळ पेशींवर संशोधन करणाऱ्या तरुण संशोधकांना दिला जाणारा जागतिक पातळीवरील स्टेम सेल्स यंग इन्व्हेस्टिगेटर अॅवॉर्ड (तरुण संशोधक पुरस्कार) या वर्षी डॉ. रोहन कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला.
लॉकडाउन सुट्टीत कोकणातील इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांनी तयार केले वापरण्यास सोपे, स्वस्त फेस शील्ड देवरुख : करोना संसर्गप्रतिबंधक फेस शील्ड तयार करून देवरुख आणि परिसरातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी लॉकडाऊनच्या काळात मिळालेल्या सुटीचा सदुपयोग केला आहे. करोना प्रतिबंधासाठी आवश्यक असलेल्या प्रचलित फेस शील्डमध्ये असलेले दोष दूर करून त्यांनी हे फेस शील्ड तयार केले आहे. शिवाय ते किफायतशीर किमतीत उपलब्ध करून दिले आहे
करोनासंबंधी काही विचार करोनाच्या साथीच्या अनुषंगाने काही विचार मांडणारा, ज्येष्ठ विज्ञानलेखक निरंजन घाटे यांचा हा लेख...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language